२५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या क्राईम रावेर

वाघोड प्रतिनिधी >>येथील रहिवासी राहुल कैलास सुतार (वय २५) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात ही घटना घडली. घरातील लाकडाच्या वेलीस साडी बांधून त्याने गळफास घेतला. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मृताच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांची मुलगी, आई- वडील, एक बहीण असा परिवार आहे. रावेर तालुका सुतार समाजाचे सचिव कैलास सुतार यांचा तो मुलगा होता.