कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही : खा. रक्षा खडसे

Politicalकट्टा कट्टा रावेर

रावेर प्रतिनिधी ::> केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे. कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, आता मालाचा भाव ठरविण्याचा निर्णय शेतकऱ्यांना राहणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी एका ऑनलाईन पोर्टलला बोलतांना सांगितले.

शहरात खासदार रक्षाताई खडसे यांनी आजहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *