कत्तलसाठी २१ बैलांना घेऊन जाणारा आयशर रावेर पोलिसांनी केला जप्त

क्राईम रावेर

रावेर प्रतिनिधी >> कत्तलसाठी २१ बैलांना आयशर गाडीमध्ये कोंबून घेऊन जाण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने शनिवारी रात्री उघडकीस आला आहे.

रावेर तालुक्यातील कर्जोद फाट्याजवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एमपी ०८ : जीए-१६७९ या क्रमांकाचे आयशर वाहन रावेर पोलिसांच्या पथकाने जप्त केले. यामध्ये २१ बैलांना अतिशय डांबून-कोंबून भरण्यात आले होते.

गाडीतील अनेक बैल हे जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी हे वाहन व बैलांना जप्त केले. यातील बैल हे पोलीस कर्मचारी सुरेश मेढे यांच्या माध्यमातून जळगाव येथील बाफना गो-शाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत. तर आयशयरचा चालक हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात विविध कलमन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.ना. नितीन डांबरे हे करीत आहेत.