रावेर तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल

क्राईम निषेध रावेर

रावेर प्रतिनिधी >> वडगाव ता. रावेर येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील कांडवेल शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर १२ वर्षीय मुलाला पैश्यांचे आमिष दाखवत संशयित आरोपी गबा उर्फ प्रेमलाल धुडकू भालेराव (वय-२३) रा. कोळोदे ता. रावेर याने १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेताच्या आजूबाजूला कोणीही नसतांना अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार शेतमालक यांच्या लक्षात आल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रेमलाल भालेराव यांच्या विरोधात निभोंरा पोलीस ठाण्यात बालसंरक्षण कायदा व लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.