रिड जळगाव टीम ::>रावेर तालुक्यातील नांदूरखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी गावातील सुनील शामराव भील याच्या विरुद्ध येथील पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदूरखेडा येथील ३० वर्षीय महिला तिच्या घराच्या ओसरीतील चूल पेटवत होती. यावेळी गावातील सुनील भील हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याने महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेने त्याला प्रतिकार केल्यावर सुनीलने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भिल याच्याविरुद्ध विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करत आहेत.