रावेर : खिरवडला गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, दोघांना अटक

क्राईम रावेर

रावेर ::>तालुक्यातील खिरवड येथील दोघांना गावठी दारू तयार करताना पोलिसांच्या पथकाने छापा मारून अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ हजार ८०० रुपये किमतीची दारूचे रसायन व तयार दारू पोलिसांनी जप्त केली आहे. कुतरू रावजी कोंघे व शेखर कुतरू कोंघे अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. खिरवड येथील नेहेता रस्त्यावरील नाल्याच्या काठावर दोघे गावठी दारू तयार करत असल्याची माहिती, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पाेलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने छापा टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *