नातींनी केले आजोबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; खिर्डीच्या बढे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

तापी रावेर रिड जळगाव टीम सिटी न्यूज

प्रतिनिधी खिर्डी >> रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील अविनाश बढे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या घरात कर्ता पुरुष दुसरा कोणी नसल्याने बढे यांच्या १५ वर्ष वयाच्या उत्कर्षा व भाविका या नातींनी बढे यांना अखेरचे पाणी देऊन अग्निसंस्कार केले. तर मुलींनी खांदा देऊन कुटुंब प्रमुखाचे अंतिम संस्कार केले. या घटनेने बढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आाहे.

अविनाश कडू बढे (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भूषण या तरुण मुलाचे मुली लहान असतानाच निधन झाले. त्यामुळे ते खचले होते. त्यांच्या पत्नी या धक्क्यातून सावरता तोच पती अविनाश बढे यांचे निधन झाले. या मुळे दोन लहान नाती व आजारी पत्नी यांच्यावर मृत अविनाश बढे यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आली.

नाती उत्कर्षा व भाविका यांनी ती स्वीकारली. तर दोन्ही मुलींनी पार्थिवास खांदा देऊन अविनाश बढे यांच्यावर अंतिम संस्कार केले. दोन्ही नातींनी आजोबांना पाणी देऊन अग्निडाग दिला. आधीच तरुण मुलाचे दुःख त्यातच सून नसल्याने आई-वडिलांपासून पोरक्या झालेल्या उत्कर्षा व भाविका यांच्या डोक्यावरील आजोबांचे छत्र हरवल्याने खिर्डी तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बढे यांच्या पश्चात दोन मुली, जावई व दोन लहान नाती असा परिवार आहे. ते दिनकर झांबरे व उमेश वराडे यांचे सासरे होत.