रावेर तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी३७ निवडणूक निर्णय अधिकारी

Politicalकट्टा कट्टा निवडणूक रावेर सावदा

रावेर प्रतिनिधी >> राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांतर्गत रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले. या नियुक्त्या राज्य निवडणूक आयोग यांनी निवडणूक विषयक दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामकाज करावयाचे आहेत तसेच सदर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण हे १८ रोजी तर द्वितीय प्रशिक्षण २१ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात हाेईल. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याची सूचनाआयोगाने केली आहे.