वखरणी करताना शॉक लागून बैलजोडी ठार, शेतकरी गंभीर जखमी

अपघात क्राईम रावेर

रावेर प्रतिनिधी >> गहू पेरणीसाठी शेतात वखरणी करताना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी, तर बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना रसलपूर-केऱ्हाळा रस्त्यावरील रावेर शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.


केऱ्हाळा बुद्रूक येथील शेतकरी प्रभाकर तुकाराम महाजन (वय ६५) हे रसलपूर येथील भागवत चिंतामण सोनवणे यांच्या रावेर शिवारात भागीदारीने केलेल्या शेतात वखरटी करत होते. या शेतात वीज वितरण कंपनीच्या कॅपेसीटरचा सेट लावला आहे. तेथे दुपारी १ वाजेच्या सुमारास बैलांना अचानक शॉक लागला. यात बैलजोडी ठार झाली. तर बैलजोडी हाकणारे प्रभाकर महाजन यांनाही शॉक लागून ते गंभीर जखमी झाले. इतरांनी त्यांना दवाखान्यात हलवले.