रावेरात वीस रुग्णांना कोविड केअर सेंटरमधून मिळाला डिस्चार्ज

रावेर सिटी न्यूज

रावेर प्रतिनिधी >> येथील कोविड सेंटरला दाखल असलेल्या रुग्णांपैकी निंभोरासीम व रावेर येथील ४ पॉझिटीव्ह परंतु बरे झालेल्या तर खानापूर, निंभोरासीम व रावेर येथील २० निगेटिव्ह रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या १४ दिवसांपासून निंभोरासीम येथील मायलेकी दाखल होत्या. त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषारणी देवगुणे, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नोडल अधिकारी डॉ. एन डी. महाजन उपस्थित होते. त्यांनी चॉकलेट देऊन या मायलेकीची तोंड गोड केले. १४ दिवस एकाच ठिकाणी असूनही मायलेकींना भेटता आले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *