रावेर-चोरवड जवळ ट्रकचा दुचाकीला मागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

अपघात क्राईम रावेर रिड जळगाव टीम

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील चोरवड जवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रल्हाद रूपचंद तायडे (वय ५५ रा मुहोम्मद पूरा बुरहानपुर ) हा आपल्या दुचाकीने बिस्किट व इतर साहित्य विक्रीसाठी रावेरकडे येत होता. चोरवड गावाजवळ आला असतांना त्यांच्या दुचाकीला ट्रकने मागील बाजूस धडक दिली. यात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले आहे.