रावेर बोरखेडा हत्याकांड प्रकरणी दोषारोपपत्र केले दाखल

क्राईम रावेर

रावेर >> राज्याला हादरवून सोडणाऱ्या बोरखेडा रोडवरील हत्याकांडप्रकरणी, घटनेतील मुख्य आरोपी महेंद्र बारेला याला शोधून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ६० दिवसांच्या आत, अर्थात १४ रोजी भुसावळ सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात येणार असून, सरकारतर्फे अॅड.उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत.

रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात महिताब भिलाल हे पत्नी व पाच मुलांसह मजुरीनिमित्त राहत होते. नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी व मोठ्या मुलासोबत ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घरी असलेल्या दोन मुली व दोन मुले अशा चौघ अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर घडली होती. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याने राज्य हादरले होते.