भाजपचा रावेरला आजपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग

Politicalकट्टा कट्टा रावेर सावदा

रावेर प्रतिनिधी >> रावेर लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शनिवारपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.

भाजपतर्फे येथील विवरा रस्त्यावरील मायक्रो व्हिजन शाळेच्या मागील हनुमान मंदिरात शनिवार व रविवार असा दोन दिवस हा वर्ग सुरू राहणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे या वर्गाचे उद्घाटन करणार आहेत.

दोन्ही दिवस दोन सत्रात पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, राज्याची राजकीय पार्श्वभूमी व पक्षाची भूमिका, कार्यपद्धती, व्यक्तिमत्त्व विकास, आपला विचार आपला परिवार, भारताची वैचारिक मुख्य धारा, राजकारणातील बदल, देशाचा इतिहास व विकास, सोशल मीडिया, आत्मनिर्भर भारत अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

अभ्यास वर्गाचे आयोजन जिल्हाप्रमुख पोपट भोळे, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.विजय धांडे व रावेर मंडळ प्रमुख प्रा.सी.एस. पाटील यांनी केले असून उपस्थितीचे आवाहन केले आहे.