चाळीसगाव : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तीन जणांवर गुन्हा दाखल

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी :>> तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीसह इतरांनी व्हिडीओ क्लिप करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तिघांवर पोक्सो कायद्यांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी कामाच्या निमित्ताने शेतात जात असतांना संशयित आरोपी दिनेश किसन राठोड रा. कृष्णापुरी तांडा ता. चाळीसगाव याने २०१८ पासून ते आजपर्यंत पटेल तेव्हा मुलीवर अत्याचार केले.

दरम्यान अत्याचार केल्याचे काही फोटो व व्हिडीओ तयार केले. याचा फायदा घेत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करण्यास सुरूवात केली.

तसेच पिडीत मुलीच्या वडीलांचा हरविलेला मोबाईल क्रमांक एका व्हॉटसॲप गुपवर ॲडमीनने ॲड करून दुसरा संशयित आरोपी योगेश दशरथ राठोड रा. कृष्णापुरी तांडा ता. चाळीसगाव याने मुलीचे काढलेले व्हिडीओ व फोटो व्हायरल केले.

याप्रकरणी पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांन्वये, जीवे ठार मारण्याची धमकी व समाजात बदनामी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन बेंद्रे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा रिड जळगावचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर.

Facebook Instagram Twitter Whatsapp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *