धुळे प्रतिनिधी ::> शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
या प्रकरणी गज्या उर्फ गजानन अहिरे या संशयिताला अटक झाली.याविषयी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार शांतीनगर येथील नवा प्लॉट परिसरात राहणाऱ्या गज्या उर्फ गजानन शेण्या अहिरे ( वय २०) याच्या सोबत ओळख झाली होती.
या ओळखीचा गज्याने गैरफायदा घेतला. मुलीशी जवळीक वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत सन २०१९ पासून हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री उशिराने गज्या उर्फ गजाननच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू असताना संशयित गज्याला अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.