ओबीसींसाठी असणारी क्रिमिलेयर मर्यादा हटवावी : खा. रक्षा खडसे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> क्रिमिलेअरमध्ये येणारे मागासवर्गीय, ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, असे लाभार्थी ओबीसी आरक्षणाच्या लाभापासून क्रिमिलेयरच्या मर्यादेमुळे वंचित राहतात. त्यामुळे ओबीसींसाठी क्रिमिलेयरची मर्यादा हटवावी अशी मागणी बुधवारी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेच्या सभागृहात सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली.

ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे भुसावळ व इतर ओबीसी संघटनांतर्फे ओबीसी आरक्षणातील क्रिमिलेयर मर्यादा हटवावी आणि इतर मागण्यांसाठी खासदार खडसे यांच्याकडे निवेदन दिले होते. आगामी २०२१ मधील जनगणनेत ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी, त्यामुळे ओबीसी जनगणनेनुसार आरक्षण वाढेल अशी मागणी खडसे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *