भुसावळ >> मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कळवा-दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर २ व ३ जानेवारीला विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक रविवारी (दि.२) रात्रीपासून सोमवारी (दि.३) पहाटे २ पर्यत असेल. यामुळे रविवारी ३, तर सोमवारी ११ गाड्या रद्द झाल्या आहेत.

१ जानेवारीला रात्री ११.५२ ते २ जानेवारीच्या रात्री ११.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

या गाड्यांचे शोर्ट टर्मिनेशन : १ जानेवारीला सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी दादर-हुबळी एक्स्प्रेस दादर ऐवजी पुण्याहून साेडण्यात येईल. १ जानेवारीला सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. २ जानेवारीला सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे हून सुटेल.

रद्द झालेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे
शनिवारी (१ जानेवारी) १२११२ अमरावती-मुंबई, १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम, १७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, तर रविवारी (दि.२) अप-डाऊन मुंबई-पुणे डेक्कनक्विन, अप-डाऊन मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, अप-डाऊन मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, अप-डाऊन मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, अप-डाऊन मुंबई-पुणे-मुंबई डेक्कनक्वीन, मुंबई-अमरावती, अप-डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस धावणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *