https://www.google.com/search?q=special+six+train+for+travelers+news&rlz=1C1CHBF_enIN914IN914&sxsrf=ALeKk02D1R46BYw9taNSS4trkxoKc4YDvA:1601092929769&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=2ahUKEwia6NL694XsAhXd73MBHUgtBOcQ_AUoA3oECA0QBQ&biw=1366&bih=625#imgrc=XkWHwVSlE2afRM

१०२ फुकट्या रेल्वे प्रवाशांना ६३ हजार दंड

क्राईम निषेध भुसावळ

प्रतिनिधी भुसावळ >> फुटके प्रवाशांवर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ जंक्शनवर शुक्रवारी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली. त्यात १०२ प्रवाशांकडून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहाय्यक प्रबंधक आणि मुख्य तिकीट निरीक्षक अहुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. त्यात १०२ फुकट्या प्रवाशांकडून ६३ हजार ६१० रुपयांचा दंड वसूल केला. यासाठी १४ तिकीट तपासणी निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यांनी ही कारवाई केली.