रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे एस.टी.बी.ए यांचा टीडीएस गायब

भुसावळ

भुसावळ, भुषण जाधव – भुसावळ विभागातील लहान स्टेशनवर ( पॅसेंजरच्या थांब्यावर ) एस.टी.बी.ए ( ऑथोराइज स्टेशन तिकीट बुकिंग एजन्ट ) कार्यरत असतात. त्यांना मासिक मिळणारे कमिशन अंदाजे 5 हजार ते 10 हजार पर्यंत असते. या छोट्यास्या कमिशन मध्ये त्यांच्या परिवाराचा उदर्निवाहाची समस्या तुटपुंज्या कमिशन मध्ये सोडविण्याचा प्रयन्त करत असतात.

गेल्या 4 वर्षांपासून डी.आर.एम ऑफिस कडून प्रत्येक एस.टी.बी.ए च्या कमिशन मधून टी.डी.एस कापला जातो. मात्र आता पर्यंत त्याचा परतावा कोणालाच मिळालेला नाही. या संबंधी डी.आर.एम ऑफिस व डी.सी.एम यांना आता पर्यंत 10 ते 12 वेळा तोंडी व लेखी निवेदन दिले. मात्र आता पर्यंत कुठलीही कारवाही झाली नाही.

अधिकारी या बाबत उडवा उडवी चे उत्तर देऊन आम्हाला त्या संबंधी माहिती नाही असे सांगण्यात येते. अशा ह्या प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे टीडीएस गायब झाल्याची चर्चा प्रशासकीय सूत्रांकडून कळते.तेव्हा टीडीएस कोणी खाल्ला असा हा मोठा प्रश्न उभा राहतो. या बाबत एस.टी.बी.ए चे सर्व उमेदवार लवकरच रेल्वे मंत्र्यांकडे निवेदन पाठवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *