धावत्या बसमध्ये २१ वर्षीय युवतीवर दोनदा अत्याचार

क्राईम निषेध पुणे महाराष्ट्र

प्रतिनिधी मालेगाव>> नागपूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लीनरनेच दोनदा बलात्कार केल्याची घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गतच्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्रीदरम्यान घडली.

गोंदियाच्या एका गावातील युवती ही पुणे येथील एका कंपनीत नोकरी करते. तरुणी ही तिच्या बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. बहिणीचे लग्न आटोपून ५ जानेवारीला नागपूर येथून ट्रॅव्हल्सने पुणे येथे परत निघाली होती.

प्रवासादरम्यान ट्रॅव्हलचा क्लीनर समीर देवकर (२५, रा. सीताबर्डी, नागपूर) हा युवतीच्या शेजारी जाऊन तिच्याशी बिलगला असता युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु समीरने पीडित युवतीचे तोंड दाबून धरून चाकूचा धाक दाखवला. जिवाच्या भीतीने घाबरलेल्या युवतीवर आरोपी समीरने दोनदा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

६ जानेवारीला ही ट्रॅव्हल्स सकाळी पुणे येथे पोहोचल्यावर पीडित युवतीने तिच्या एका मित्राला फोन करून आपबीती सांगितली. त्यानंतर युवती आणि तिच्या मित्राने पुणे येथील ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून फिर्याद नोंदवली.