जिल्ह्यात पुन्हा जिल्हा परिषदेच्या एका बड्या पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण!

Jalgaon Politicalकट्टा जळगाव

रीड जळगाव टीम >> जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून यामध्ये अनेकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात एका राजकीय बड्या पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मिडीयावर होत आहे.

माजी आमदार-खासदार यांच्यासह जिल्ह्यात अनेक बड्या नेत्यांसह कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काहींचा उपचारादरम्यान मृत्यू ही झाल्याचे निदर्शनास आले असून आजही जिल्ह्यातील अनेक जण विनाकारण बाहेर ये-जा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन लावावा अशी मागणी सोशल मिडीयावर होत आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा यावर विचार करावा अशी ही मागणी सोशल मिडीयावर जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *