फडणवीसांनी हिंदुत्व शिकवू नये ; नामांतरावरून मंत्री गुलाबरावांचा निशाणा

Aurangabad Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी >> हिंदुत्व काय असत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेचा जन्मच मुळी हिंदुत्वावर झालेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विषय हा महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून घेतील, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

संभाजीनगर असे नामांतर करण्याची इच्छा ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. अजूनही शिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. या शहराच्या नामांतराचा विषय चुकीचा नाही. परंतु शासनाच्या स्तरावर या शहराचे नामांतर करण्याच्या विषयावर राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. नामांतराच्या विषयाची चिंता कुणी करू नये आणि त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व देखील शिकवू नये, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी विरोधकांना खडसावले.