दहीगावात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मध्यस्थीने शांतता

Social कट्टा कट्टा यावल

दहीगाव ता. यावल प्रतिनिधी ::> येथील मेन चौकात झालेल्या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावल पोलीस स्टेशनचे पो. नि. अरुण धनवडे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने गावात शांतता निर्माण झाली. या ठिकाणी दोघा मित्रांमध्ये जुन्या कारणावरून वाद उफाळून आला होता. व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात तात्काळ यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गावातील कोण्या एका व्यक्तीने फोन केला लागलीच पो. निरीक्षक अरुण धनवडे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ दाखल आले व झालेला वाद त्यांनी मोठ्या सामान्यापणाने निवळला. दोघं मित्र दोघ तिघ मित्रांचे वाद त्यांनी गावातच मिटवले आणि तात्काळ शांतता निर्माण केली. हे तिघे तरुण मित्र सुशिक्षित असून शिक्षण घेत आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असे सूत्रांकडून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *