२० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा पोलिस अटकेत

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शेतात काम करणाऱ्या २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

कैलास तुकाराम धाडी (वय ३९, रा. लोणवाडी, ता. जळगाव) असे अटक केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धाडी याचे लोणवाडी परिसरात शेत आहे. या शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या २० वर्षीय विवाहितेवर त्याने ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२० दरम्यान, वेळोवेळी अत्याचार केले. या प्रकरणी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात महिन्यांपूर्वी फिर्याद दाखल केलेली होती.