रिड जळगावच्या बातमीची दखल घेत पिळोदा ते साकळी रस्त्यावरील काटेरी झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढली!

Social कट्टा कट्टा यावल साकळी

साकळी प्रतिनिधी ::> पिळोदा ते साकळी रस्त्यावर काटेरी झुडपे वाढल्याची बातमी रिड जळगाव वर प्रकाशित झाली होती. जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील उर्फ छोटू भाऊ व यावल पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील यांनी दखल घेत 27 सप्टेंबर ते आज 29 सप्टेंबर 2020 रोजी रस्त्यावर असलेली काटेरी झुडपे जेसीबी च्या सहाय्याने काढून पिळोदा वासियांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी रिड जळगाव ने दिलेल्या बातमीची दखल घेऊन परिसरात रखडलेल्या कामांना सुरुवात होत आहे. तसेच पिळोदा येथील नागरिकांनी व पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील यांनी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील व दीपक अण्णा पाटील यांचे आभार मानले असून रिड जळगाव न्यूज पोर्टलला सुध्दा शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या व जाहिरात ::> 7774943264

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *