शरद पाटील प्रतिनिधी पारोळा >> शहरातील अत्यंत रहदारीचा व्यापारी दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पारोळा कजगांव रोडाची फार दुरवस्था झालेली सदर रस्याच्या चौफुली नाका नं. १ वर फार मोठ मोठे खड्डे पडले असुन नालिचे सर्व पाणी २४ तास रस्त्यावरून वाहत असल्याने सदर परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली असुन परिसरातील नागरिकांच्या जिवीतास देखील त्याचा खुप मोठा धोका निर्माण झालेला आहे.

सदर रस्त्यावर धुळे-चाळीसगांव कडुन येणाऱ्या जाणाऱ्या मोठ मोठ्या अवजड वाहनांचा त्या खड्यांमध्ये तोल जाऊन मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. तरी सदर रस्त्याकडे प्रशासनाचे होत असलेल्या दुर्लक्षा मुळे नागरिकांमध्ये प्रशासना विरुध्द तीव्र नाराजी आहे. तरी सदर प्रकरणी आपल्या स्वरावरून योग्य ती दखल घेऊन दुरुस्तीचे काम १५ दिवसांचे आत करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्याचे होणारे परिणामास आपले राहिल याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदन पारोळा मनसेने दिलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *