पारोळा-तामसवाडी येथील ३८ वर्षीय तरुणाचा बोरी धरणात बुडून मृत्यू

आत्महत्या क्राईम पारोळा

पारोळा ::> तामसवाडी येथील रहिवासी ३८ वर्षीय तरुणाचा बोरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३ नोव्हेंबरला घडली. मनोहर बाबुराव महाले यांचा मृतदेह ३ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता बोरी धरणातील पाण्यात तरंगत असल्याचे समोर आले. नातेवाइक व ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सुभाष आनंदा महाले यांच्या खबरीवरुन पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.