पिंपळकोठ्यात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या क्राईम पारोळा

पारोळा >> तालुक्यातील पिंपळकोठा येथे ७ मार्चला पहाटे ५ वाजता एका ४८ वर्षाच्या प्रौढाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. पिंपळकोठा येथील नवनीत भगवान पाटील (वय ४८) हे अनेक दिवसापासून आजारी होते. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते.

रविवारी त्यांनी त्यांच्या घरा शेजारील शाळेच्या आवारातील एका झाडाला गळफास घेतल्याची घटना पहाटे ५ वाजता उघडकीस आली. काही नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.

या वेळी प्रमोद पाटील, मुकेश पाटील, राजेश पाटील यांनी नवनीत पाटील यांना खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ. योगेश साळुंखे यांनी तपासून पाटील यांना मृत घोषित केले.

याबाबत महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास नाना पवार करत आहेत.