पारोळा‎ >> नागरिकांनी आपले हक्क, अधिकार ‎ ‎ आणि कर्तव्याचा अभ्यास करून ‎ ‎ जागरूक आणि सजग ग्राहक व्हावे, ‎ ‎ असे आवाहन तहसीलदार अनिल‎ गवांदे यांनी केले.‎ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त‎ शुक्रवारी तहसील कार्यालयात ‎ आयोजित कार्यक्रमात तहसीलदार ‎ ‎ गवांदे अध्यक्ष स्थानावरून बोलत‎ होते.

तहसीलदार गवांदे म्हणाले की,‎ ग्राहक हक्क कायद्यांतर्गत ग्राहकांना‎ विविध प्रकारचे सहा हक्क‎ मिळतात. यात सुरक्षेचा हक्क,‎ माहिती मिळवण्याचा हक्क, निवड‎ करण्याचा हक्क, मत मांडण्याचा‎ हक्क, तक्रार आणि निवारण‎ करण्याचा हक्क, ग्राहक हक्काच्या‎‎ शिक्षणाचा हक्क या सहा हक्कांचा‎ अभ्यास केल्यास फसवणूक होणार‎ नाही. तसेच स्वानुभवाचे दाखले‎ देवून ग्राहकाने जागरूक राहण्याचे‎ आवाहन त्यांनी केले. तर मूलभूत‎ हक्कांची पायमल्ली होत असेल‎ अथवा फसवणूक केली जात‎ असेल, त्यावेळी कायदा आधार‎ बनतो. म्हणून प्रत्येक ग्राहकाने‎ कायद्याची माहिती घेणे गरजेचे‎ असल्याचे मत जिल्हा सहसंघटक‎ अॅड. कृतिका आफ्रे यांनी या प्रसंगी‎ व्यक्त केले.‎

प्रमुख अधिकाऱ्यांची ग्राहक दिनाकडे पाठ …‎ ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यलयात तहसीलदार अनिल गवांदे यांच्या‎ अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख आमंत्रित‎ असणारे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, गटविकास अधिकारी विजय लौंढे,‎ मुख्याधिकारी ज्योती भगत, महावितरणचे अभियंता जी. एस. मोरे, तालुका‎ कृषी अधिकारी बी. व्ही. वारे यांची अनुपस्थिती होती. परिणामी ग्राहक‎ दिनाकडे या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने राज्य अशासकीय सदस्य‎ विकास महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *