पारोळा: भोकरबारी येथील वृद्ध शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

क्राईम पारोळा

पारोळा ::> तालुक्यातील भोकरबारी येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. प्रकाश रतन बडगुजर असे मृताचे नाव आहे.

प्रकाश बडगुजर हे १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शौचविधीसाठी बाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ झाल्यावरही ते घरी परत आले नाहीत. यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. त्यात बुधवारी दुपारी १२ वाजता भोकरबारी शिवारातील लक्ष्मण कौतिक पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. पुतण्या रवींद्र बडगुजर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ते विधवा सून व एका नातूसह राहत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *