पारोळ्यात लाचखोर पोलिसासह पोलिस पाटलाला घेतले ताब्यात

क्राईम चोरी, लंपास निषेध पारोळा पाेलिस

पारोळा >> पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या आई-वडिलांना आरोपी न करण्यासाठी तसेच त्याच्या भावाला जामिनासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना, पोलिस कर्मचारी रवींद्र त्र्यंबक रावते आणि मंगरूळ (ता. पारोळा) येथील प्रल्हाद पुंडलिक पाटील यास एसीबीने गुरुवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात १० हजार रुपयांची लाच घेताना दोघे जाळ्यात अडकले.