पारोळा ::> तालुक्यातील टोळी येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या सतर्कतेने तिचे प्राण वाचले. शहरात मामाकडे दिवाळीसाठी ती आली असता ७ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरातून गेली होती.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छोटे राम मंदिर परिसरातील विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली.
मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या विनायक पाटील, सिद्धाराज महाजन, राहुल महाजन, बापू महाजन, गिरीश चौधरी, आकाश चौधरी, विजय साळी यांनी तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर डॉ. योगेश साळुंखे यांनी प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवले.