भुसावळ ::> मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पाच महिन्यांपेक्षा अधीक काळानंतर ही गाडी चाकरमान्यांसाठी सुरू केली जात आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावावा, तसेच सोबत सॅनिटायझर बाळगावे. प्रवाशांनी गाडी सुटण्यापुर्वी ९० मिनिटे आधी रेल्वे स्थानक गाठावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पंचवटी एक्स्प्रेसची सेवा सुरु होत असल्याने, प्रवाशांना निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. गाडीत प्रवाशांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या गाडीचे आरक्षण १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.