पहूर पोलिस ठाणे तर्फे ईद निमित्त रुट मार्च मोर्चा

जामनेर पहूर

पहुर प्रतिनिधी :> जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे च्या वतीने उद्याच्या रमजान ईद निमित्त पहूर शेंदुर्णी येथे रुट मार्च मोर्चा आयोजित करण्यात आला होता पहूर येथील पहूर पेठ मेन रोड बस स्टँड कसबे गावात मेन रोड रुट मार्च मोर्चा काढण्यात आला तसेच शेंदुर्णी येथे मेन रोड मार्ग रूट मोर्चा काढण्यात आला पोलीस ठाणे अंतर्गत ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक अमोल दिवटे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी वाहतुक पोलिस जवान सिंह राजपूत यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी व होमगार्ड या मोर्चात सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *