पहूर प्रतिनिधी >
जामनेर तालुक्यातील पहूर पेठ व पहूर कसबे या भागातील लेले नगर पहुर पेठ मेन रोड याठिकाणी रविवारी अनधिकृत बाजार भरला. सध्या जगभरात सर्वत्र कोराना आजाराचे थैमान सुरू असताना महाराष्ट्र शासनाने 31 मे पर्यंत महाराष्ट्र संचारबंदी लागू असताना जामनेर तालुक्यातील वेशीपर्यंत या आजाराचे संकट येऊन ठेपले असताना असे असले तरी रविवार रोजी मात्र पहूर येथे लेले नगर पहुर पेठ मेन रोड याठिकाणी अनधिकृत आठवडे बाजार भरला होता.
सोशल डिस्टन्स पुरता बोजवारा या बाजारात उडाला असून गावामध्ये नाशिक पुणे मुंबई सुरत या ठिकाणाहून काही नागरिक गावात आले असून बाजारातून कोराना सारख्या महाभयंकर आजाराला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बाजाराबद्दल स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाला तक्रार अर्ज दिला असता पोलीस प्रशासनाने तक्रार अर्ज न घेता बाजार भरला गेला याची माहिती स्थानिक पत्रकार यांना मिळाली असता सर्व पत्रकारांनी बाजाराच्या ठिकाणी जाऊन बाजार सुरू असल्याचे फोटो काढले पोलीस प्रशासनाला तक्रारीचे निवेदन देण्याच्या विषयी विचारले असता आणि पोलीस ठाण्याचे पहूर बीट अंमलदार अनिल अहिरे यांना विचारले असता काही लोकप्रतिनिधी यांनी पाच वाजेपर्यंत बाजार उठू नये अशी माहिती सांगितली असे त्यांनी सांगीतले.
यासंदर्भात जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली असता त्यांनी सांगितले की स्थानिक प्रशासनाने ही कारवाई करावी पहूर येथे संचारबंदी सुरू असताना सोशल टेस्टिंग बोजवारा उडाला असून पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.