पहुर प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे अवैध धंद्या विरोधात पहुर पोलिसांनी जोरदार धडक मोहीम उभारली असून आज पुन्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोरे पहुर व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांचे सूचनेनुसार अवैध धंदे विरुद्ध मोहीम अंतर्गत पहूर पोस्ट हद्दीत शेंदुर्णी गावात जिल्हा परिषद शाळेसमोर एका घराचे त्याला पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सपोनि राकेश सिंह परदेशी यांना मिळालेले असता आपले सहकारी पोलीस हवालदार विनय सानप पोलीस शिपाई जितू सिंग परदेशी पोलीस शिपाई श्रीराम धुमाळ असे पथक तयार करून मिळून रात्री 11.00 ते 12.00 वा चे सुमारास वरील ठिकाणी छापा मारून आरोपी 1 अतुल रतन कोळी 2 योगेश ज्ञानेश्वर कोळी 3 अजय सदाशिव पाटील 4 मंगेश सुभाष कोळी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य 2730 रुपये रोख जप्त करण्यात आले असून वरील चारही आरोपि विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पहुर पोलीस ठाण्याचे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांचे सहकारी यांनी जोरदार अवैध धंदे विरोधात मोहीम सुरू ठेवले नागरिकांनी स्वागत केले आहे.