भाजप पदाधिकाऱ्याचे घर फोडले ; १५ लाखांची चोरी

क्राईम जामनेर पहूर

पहूर प्रतिनिधी ::> भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे जामनेर तालुकाध्यक्ष तथा पहूर पेठ येथील खाजानगरातील रहिवासी सलीम शेख गनी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी गुरुवारी (दि.८) रात्री कपाटातील तब्बल १५ लाखांची रोकड लांबवली. जमिनीचा व्यवहार केल्यानंतर त्यांना ही रक्कम प्राप्त झाली होती. तसेच रविवारी मुलाचे लग्न असल्याने घरी ये-जा वाढली होती. त्यातच ही चोरी झाली.

सलीम शेख हे गुरुवारी जळगाव येथे नातेवाइकांकडे मुक्कामी होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश केला. हॉलमधील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली १५ लाख ८ हजारांची रक्कम लंपास केली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सलीम शेख कुटुंबासह घरी आले. यावेळी चोरी उघडकीस आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *