पाडळसे येथे रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार!

यावल

झाडावर चढल्याने दुसरा शेतकरी सुदैवाने वाचला

रिड जळगाव टीम यावल ::> रेड्याच्या हल्ल्यात ४८ वर्षीय शेतकरी ठार झाल्याची घटना सोमारी दुपारी ३.३० वाजता तालुक्यातील पाडळसे येथे घडली. रवींद्र भास्कर कोळी असे मृताचे नाव आहे, सुदैवाने दुसरा शेतकरी या हल्ल्यात वाचला.

पाडळसे येथील महाकालेश्वर नगरमधील रहिवासी रवींद्र कोळी हे म्हशी व रेडा घेऊन सोमवारी नेहेमीप्र्रमाणे चराईसाठी गेले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांचा रेडा बिथरला. रेड्याने रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला केला.

त्यामुळे शेजारच्या शेतातील शेतकरी नरोत्तम श्रीधर कोळी यांनी रविंद्र कोळी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रेड्याने नरोत्तम कोळी यांच्यावरही हल्ला केला. प्रसंगवधान राखत ते झाडावर चढल्याने बचावले. तर रवींद्र कोळी यांचा या घटनेत मृत्यू झाला.

माहिती मिळताच उपसरपंच रजनीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खेमचंद्र कोळी, पोलिस पाटील सुरेश खैरनार यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत रेड्याला पकडले. फैजपूरचे हवालदार गोकुळ तायडे, महेश वंजारी यांनी मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *