सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ऑनलाईन राज्यव्यापी आंदोलन

पाचोरा सिटी न्यूज

पाचोरा >>कोरोना या रोगामुळे संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागु केली आहे. संचारबंदी मुळे सर्व कामे ठप्प झालेली असली तरी महिलांवरील हिंसाचार, कामगारांवर होणारे हिंसाचार, दलीत बांधवांवर होणारे हिंसाचार, शैक्षणिक हिंसाचार, ऑनरकीलींग हिंसाचार इत्यादी हिंसाचाराचे प्रकार हे राज्यात मोठया प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. असे होणाऱ्या हिंसाचार थांबावे म्हणुन सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन करत आहे.


दलित, आदिवासी, स्त्रिया, भटक्ये विमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर होत असलेल्या हिंसे संदर्भात फेसबुक या सोशल मिडीया च्या माध्यमातुन राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन करण्यात आले. वरील विषय घेऊन पाचोरा येथील तुषार सुर्यवंशी व शितल पाटील या संघटनेच्या कार्यकर्तांनी पाचोरा येथील तहसिलदार राजेंद्र कचरे यांना १५ तारखेला निवेदन दिले. अशा प्रकारे सोशल मीडिया च्या माध्यमातून मोठं जनव्यापी आंदोलन उभ करण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनेने घेतला होता.


आंदोलन हे संपूर्ण राज्यात १५ रोजी सकाळी 09 वा. सुरू करण्यात आले. त्यानंतर 12:00 वा.निवडक 5 कार्यकर्त्यांनी सर्व नियम पाळून मा.जिल्हाधिकारी/तहसीलदार यांना निवेदन दिले. 01 वाजता ईमेल द्वारे निवेदन पाठवले. अशी माहिती अमोल खरात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष यांनी दिली. तसेच या आंदोलनात मोठया संख्येने विद्यार्थांनी सहभागी नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *