पाचोऱ्यात पंचाण्णव हजाराचा देशी विदेशी अवैध वाहतूक मद्यसाठा जप्त!

क्राईम

पाचोरा >> येथील दारू विक्री करण्यासाठी दारू साठा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असलेल्या रिक्षात सुमारे ९५ हजार विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केला आहे. ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे यशवंत भिका घोरसे यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की आज सकाळी ११.३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक रिझाणी ब्रेंडी हाऊस गोठू शेठ यांच्या कडून दाजीबा हॉटेलचे मालक सुनील मराठे यांच्या सांगण्यावरून जितेंद्र लोटन पाटील रा.राजीव गांधी नगर हा रिअल रिक्षा एम.१०.जे ८८४८ या रिक्षातुन अवैध विदेशी दारू चोरटी वाहतूक करीत होता. ही गोपनिय माहिती पाचोरा पोलीस स्टेशनचे यशवंत भिका घोरसे यांना मिळाली. त्यांना रिक्षातुन अवैध दारू वाहतूक करीत असल्याची दिसून आले.

त्यांनी विचारपूस केली असता रिझाणी ब्रेंडी हाऊस गोठू शेठ यांच्या कडून दाजीबा हॉटेलचे मालक सुनील मराठे यांच्या सांगण्यावरून करीत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या सांगण्या वरून रिझाणी ब्रेंडी हाऊसचे २) गोदु शेठ पुर्ण नाव माहीत नाही 3) सुनिल मराठे पुर्ण नाव माहीत नाही रा- विवेकानंद नगर पाचोरा आरोपी 1) आबा ऊर्फ जितंद्र लोटन पाटील, वय, 39, रा. राजीय गांधी यांच्याविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिशन ऍ्ट कायदा कलम 65 (ई) (अ) प्रमाणे फि्याद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *