पाचोरा तालुक्यातील युवतीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

क्राईम पाचोरा

पाचोरा >> तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लहुजी संघर्ष‌‌‌ सेनेने पोलिस उप अधीक्षक भारत काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथील एका तरुणीवर गेल्या काही महिन्यांपासून शेजारी महिलेच्या मध्यस्थीने वारंवार अत्याचार सुरू होते. त्यामुळे तरुणी गर्भवती होऊन तिने एका मुलीला जन्म दिला आहे.

दरम्यान, यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सूत्रधार समीना तडवीसह एक आरोपी फरार आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत फरार आरोपींना तत्काळ जेरबंद करून फाशीची शिक्षा द्यावी,असे नमूद केले.