सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयितास कोठडी

क्राईम पाचोरा

पाचोरा >> सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणारा मुख्य संशयित रमेश ईश्वर बागुल (वय ५०), रा. नगरदेवळा यास पोलिसांनी नाशिक येथून जेरबंद केले. त्यास न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलिसांत रमेश बागुल याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो हल्ली विजापूर येथे सीआरपीसीमध्ये नोकरीस आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. त्याने काही मुलांना सैन्य दलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेत फसवणूक केली होती.

याबाबत पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलिस नाईक राहुल सोनवणे, विश्वास देशमुख, कॉन्स्टेबल विनोद बेलदार, किरण पाटील तसेच एलसीबीचे वारुळे यांच्या मदतीने रमेश बागुल यास नाशिक येथून पाच दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील करत आहेत.