तुझ्या भावाला मारुन टाकेल, अशी धमकी देत नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड ; गुन्हा दाखल

क्राईम पारोळा

पारोळा ::> तालुक्यातील विचखेडे येथे मंगळवारी सकाळी गावालगतच्या बोरी नदीकाठावर दोन अल्पवयीन मुलींची छेडखानी झाली. या प्रकरणी मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा येथे एका संशयितावर गुन्हा दाखल झाला.

विचखेडे येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या अनुक्रमे १६ आणि १७ वर्षांच्या मुली मंगळवारी सकाळी गावालगत बोरी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास त्या दोन्ही रडत घरी आल्या.

गावातील पंकज गुलाब गायकवाड याने लज्जास्पद वर्तन आणि छेडखानी केली. चापटबुक्क्यांनी मारहाण करुन कुणालाही माहिती दिल्यास तुझ्या भावाला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी पंकज गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला. तपास प्रकाश चौधरी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *