कृषि विभागातर्फे Microsoft Teams द्वारे खरीप हंगाम ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

ऑनलाईन-बिनलाइन धरणगाव

धरणगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील कृषि विभागातर्फे पिक कापणी ग्रामस्तरीय प्रशिक्षण वर्ग दिनांक २२ जुलै रोजी दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षण हे Microsoft Teams द्वारे online घेण्यात आले.

या प्रशिक्षणा प्रसंगी मा. जाधवार साहेब, उपविभागिय कृषि अधिकारी अमळनेर यांनी जॉईन होऊन मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षण वर्गास मा.नितीनकुमार देवरे, तहसिलदार धरणगाव, मा. अभिनव माळी, तालुका कृषि अधिकारी धरणगाव यांनी देखील मार्गदर्शन केले.


तसेच जिल्हा परिषद यंत्रणेचे गटविकास अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक सांख्यिकी चे कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते. सदर प्रशिक्षण वर्गास पिक कापणी प्रयोगाचे सादरीकरण व cce agri aap विषयी चे मार्गदर्शन श्री. अरूण कोळी, पर्यवेक्षक यांनी केले. तर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी गोपाल मराठे, ऑपरेटर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *