फार्मसी विद्यार्थी काॅम्रेड संघटना,महाराष्ट्र राज्यच्यावतीने स्वतंत्र भारताच्या इतिहासावर आधारित ऑनलाईन स्पर्धा

ऑनलाईन-बिनलाइन

प्रतिनिधी(दिपेश पालीवाल)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फार्मसी विद्यार्थी काॅम्रेड संघटना,महाराष्ट्र राज्य च्या वतीने स्वतंत्र भारताच्या इतिहासावर आधारित ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यातील विद्यार्थ्यांनी परिक्षेत सहभाग नोंदविला. या परीक्षेत चांगले मार्क्स मिळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला संघटनेमार्फत ई-सर्टिफिकेट देण्यात आले.

आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक उपक्रम राबविले जातील असे आश्वासन परिक्षेचे आयोजक दिपक पाटील फाजगे यांनी दिले तर फार्मसी विद्यार्थी कॉम्रेड संघटना विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीच नाही तर सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष मा.ललित भाऊ पाटील यांनी केले आहे.

परिक्षेच्या यशस्वीतेसाठी केतन देवरे, मंगेश चिखलीकर, विनायक कोंढाळकर, पंकज वानखेडे, परिमल ठाकरे, आदेश निंबाळकर, पियुष चौधरी, शुभम पांचाळ, दिपक पाटील, रोहित बाविस्कर, सुरज गायकवाड आदींनी आतोनात परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *