कांदा दराने पार केला २ हजार रुपयांचा टप्पा

Jalgaon जळगाव

उच्च गुणवत्तेच्या कांद्याला मिळतो २३०० चा दर

रिड जळगाव टीम ::> उन्हाळी कांद्याचे दर आता वाढत असल्याने तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सुखावला आहे. मात्र वाढीव भावाचा फायदा केवळ कांदा चाळ असलेल्या अल्प शेतकऱ्यांनाच मिळेल. कांद्याचे सर्वसाधारण भाव दोन हजार ते २३०० रुपयांपर्यंत आहेत.

पावसानंतर आता कांद्याला मागणी वाढत आहे. देशातून होणारी निर्यातही वाढल्याने दरात वाढ झाली. यामुळे चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कांद्याचे दर गेल्या महिनात केवळ ८०० ते ९०० रुपये क्विंटल होते. हे दर सध्या दोन हजार ते २३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला २५००पेक्षा अधिक दर मिळत आहेत.

कांद्याचे दर पुन्हा वाढतील? अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे आता टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र वाढीव कांदा दराचा भाव अल्प शेतकऱ्यांना मिळत आहे.

उन्हाळ्यात कांदा निघाल्यानंतर शेतकरी तातडीने विक्री करुन मोकळे होतात. तर काही शेतकरी पावसाळ्यापर्यंत कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात. चाळ असणाऱ्यांची संख्या कमी आहे. अशा शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *