भुसावळातील महिलेच्या मोबाईलवर अश्लील फोटो मेसेज पाठविल्याने एकावर गुन्हा दाखल!

क्राईम भुसावळ

भुसावळ >> शहरातील एका महिलेच्या मोबाईलवर आणि सोशल मिडीयावरील फेसबुकवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठविल्याने, पुणे येथील संशयित युवकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. शहरातील एका महिलेच्या फेसबुक आणि व्हाटसअप क्रमांकावर पुणे येथील संशयित प्रदीप अरुण आढाव याने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले. यामुळे महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *