रावेर-निंभोरा येथे रेल्वेखाली आल्याने एक जण ठार

NIMBHORA अपघात क्राईम रावेर

रावेर प्रतिनिधी ::> तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

निंभोरा रेल्वे स्टेशन नजीक अप लाइनवर अज्ञात पुरुषाचा धावत्या रेल्वेखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीच्या डोक्यास मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.