विद्यापीठात आर्थिक घोटाळा झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वच्छतेच्या साधनानांवर लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवले जातात मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे.

लाखोंचे ठेके देऊन कामे होत नसल्याने यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच कायद्याच्या तरतुदींची पायमल्ली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने कुलगुरूंकडे केली आहे.

विद्यापीठात स्वच्छतागृहातील फिनाइलसाठी दरमहा एक लाख रुपयाचे बिल ठेकेदारास अदा केले जाते; परंतु सुविधा कोणत्याही दिसत नाही.

यासोबतच विद्यापीठाच्या नोटीस बोर्डवरील माहिती अद्ययावत नाही, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, विद्यापीठात सुरु असलेला भ्रष्टाचार, सिनेट सदस्यांचा मनमानी कारभार, अवैध बिले, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये रॅगिंगचे होणारे प्रकार, भूसंपादन करताना कोणत्या जमिनी कशा आधारावर घेतल्या आहेत, त्यांची बिले देताना सर्वच वेळेस कोर्टाने आदेश केल्यानंतर देखील बेकायदेशीर ठराव यांसारखे प्रकार घडत आहे. हे कृत्य कोणाच्या दबावाखाली येऊन केले जात आहे हे जाहीर करावे अन्यथा आंदोलन करून अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा अॅड कुणाल पवार व भूषण भदाणे यांनी दिला आहे.