विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> इयत्ता बारावी वर्गाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीएसडब्ल्यु, बीव्होक, बीएफए, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएस (ई-कॉमर्स), एमसीए (इंटिग्रेटेड), एमबीए (इंटिग्रेटेड), डीसीएम, डीसीए, डीएमई अॅड आयएम, बीपीई व मान्यताप्राप्त पदवी, पदवीकास्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. महाविद्यालयांनी सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता व विविध शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांच्या फाईल १८ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यापीठास सादर कराव्या लागणार आहे.